उन्हाळ्याच्या (Summer) हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. तसेच याकाळात त्वचेच्या (Skin) अनेक समस्या निर्माण होतात. उष्माघाताबरोबरच ताप, अन्नातून विषबाधा, पोटाचा त्रास, जुलाब अशा समस्यांचे प्रमाणही अधिक वाढते. थकवा शरीरात लवकर येतो. दहा मिनिटे जरी घराबाहेर या हंगामात पडले की, लगेचच डोकेदुखीची (Headache) समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे उन्हात निरोगी राहण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.
उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे आणि यावर्षी भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये नेहमीपेक्षा जास्त उष्ण असण्याची अपेक्षा आहे. मार्च महिना आहे आणि आतापासून कडक उन्हामुळे सर्वांची अवस्था दयनीय झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान बदलले की ते अनेक आजारही घेऊन येतात. उन्हाळ्यातही त्वचा, डोळे आणि पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. दिवसा कडक उन्हात चालल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचा टॅन सारख्या समस्या निर्माण होतात.
प्रत्येकाला ऑफिस, शाळा किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडावे लागते. अशा वेळी तुम्ही जराही निष्काळजीपणा दाखवलात तर तुम्ही आजारी पडू शकता. काही जीवाणू आणि विषाणू उष्णतेमध्ये अधिक वेगाने पसरत असल्याचे दिसते ज्यामुळे कांजिण्या, गोवर, टायफॉईड, कावीळ, संसर्गजन्य हिपॅटायटीस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारखे रोग होतात. म्हणून आज आपण उन्हाळ्यात स्वत:ची काळजी घेण्यासाठी काय करू शकतो ते जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात घामामुळे आपल्या शरीरीताल भरपूर पाणी आणि खनिजे निघून जातात ज्यामुळे अनेकदा डिहायड्रेशन होते. त्वचेची जळजळ, त्वचारोग आणि उष्माघात हे उन्हाळ्यातील इतर काही सामान्य आजार आहेत. या महिन्यांमध्ये आजारी पडू नये म्हणून आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची अतिरिक्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
झोप:
पुरेशी झोप न लागणे, भूक वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, एकाग्रता कमी होणे, वारंवार आजार होणे अशा समस्यांचा आपल्याला त्रास होतो. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र लहान असते म्हणून किमान 7 तासांची झोप घ्या. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात निरोगी राहण्यास मदत होईल. झोपेच्या वेळी उबदार शॉवर घेतल्याने तुम्हाला रात्री शांत झोप लागू शकते.
हायड्रेटेड राहा:
हायड्रेट राहण्यासाठी आणि भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी हा योग्य मार्ग आहे. फळांचा रस किंवा ताज्या काकडीचा रस तुम्ही उन्हाळ्.ात पिऊ शकता.त्याचबरोबर नारळ पाणीही पिऊ शकता. यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.
फायबरयुक्त अन्न:
भाज्या, फळे, नट आणि धान्ये फायबर समृद्ध असतात. फायबरयुक्त अन्नाचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला जास्त भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही बेफिकीरपणे खाण्याची शक्यता कमी असते. दिवसातून कमीतकमी 25 ग्रॅम फायबरचा आहारात समावेश करा.
साखरेचे सेवन:
सहा चमचापेक्षा जास्त साखर एका दिवसात खाऊ नका. हा नियम तुम्ही रोज पाळला तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. कारण एक चमचा साखर चार ग्रॅम साखरेच्या बरोबरीची असते. यामुळे कॅलरीज आणि मधुमेह वाढू शकते. म्हणून नैसर्गिक गोडवा असलेली फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
अल्कोहोलवर नियंत्रण ठेवा:
मद्यपान केल्याने अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. अल्कोहोलचे सेवन केल्यास तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. अल्कोहोलच्या सर्व्हिंगमध्ये सुमारे 100 कॅलरीज असतात आणि मिक्स पेयांमध्ये त्याहूनही अधिक असते. महिला असो वा पुरुष उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन करणे बंद करा.
व्यायाम करा:
घरी राहा पणम सकाळी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ताजी हवा घेण्याचा प्रयत्न करा.रोज सकाळी साधे व्यायाम करा.योगा किंवा प्राणायम करून तुम्ही स्वत:ला दिवसभर फ्रेश ठेवू शकता.
साधे कपडे घाला:
उन्हाळ्यात काळ्या किंवा डार्क रंगाचे कपडे घालण्याएवजी हलक्या किंवा पांढऱ्या रंगाचे पातळ आणि लूज कपडे घाला. यामुळे तुमचे उन्हापासून संरक्षण होईल आणि लूज कपड्यांमुळे हवा खेळती राहिल. बाहेर जाताना सन ग्लासेस, सनकोट आणि स्कार्फचा वापर करा.
आहार:
योग्य आहार, व्यायाम आणि विश्रांती घेऊन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही निरोगी राहू शकता आणि आनंदी आयुष्य जगू शकता. फक्त तुमच्या शरीराचा आदर करणे आणि त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
दिवसभर भरपूर पाणी प्या. पण फ्रिजमधलं पाणी पिण्याची गरज नाही.मातीच्या मडक्यातील पाणी प्या. प्रत्येक 30 मिनिटांनी पाणी प्या. तसेच आपण पण नारळ पाणी आणि फळांचा रस देखील पिऊ शकतो. शरीरातील ओलावा टिकवून ठेवणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डिहायड्रेशन सारखी समस्या उद्भवते. उष्माघाताच्या लक्षणांमध्ये ताप, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि नाक वाहणे यांचा समावेश होतो. तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास, प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या हंगामात आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि डाळींचा समावेश करा. यामुळे आपले शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. तसेच फास्ट फूड आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पूर्णपणे बंदच करा. ज्यूस देखील बाहेरचा प्यायचा नाही. घरीच फळांचा ताजा ज्यूस करून प्या.